
मुंबई विद्यापीठाची सिनेट निवडणूक स्थगित करणार्या मिंधे सरकारला उच्च न्यायालयाने मोठा दणका दिला आहे. युवासेनेने दाखल केलेल्या याचिकेवर उच्च न्यायालयाच्या सुट्टीकालीन एकलपीठाने तातडीने सुनावणी घेतली आणि सिनेट निवडणूक 24 सप्टेंबर रोजी घेण्याचे आदेश दिले. हा निर्णय देताना न्यायालयाने मिंधे सरकार आणि मुंबई विद्यापीठाच्या मनमानी कारभारावर कडक शब्दांत ताशेरे ओढले.
पराभवाच्या भीतीने सिनेट निवडणुकीचा कार्यक्रम पुढे ढकलणाऱ्या मिंधे सरकारला न्यायालयाच्या या निर्णयाने सणसणीत चपराक बसली आहे. 3 ऑगस्टच्या अधिसूचनेला अनुसरून येत्या 24 सप्टेंबर रोजी सिनेट निवडणूक घ्या आणि 27 सप्टेंबर रोजी मतमोजणी करत निकाल जाहीर करा असे आदेश उच्च न्यायालयाने मिंधे सरकार आणि उच्च न्यायालयाला दिले.