
विधानसभा निवडणूक कधीही होवू देत दापोली विधानसभा मतदारसंघात फक्त आणि फक्त शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचाच उमेदवार निवडून येणार, असा ठाम विश्वास माजी आमदार आणि शिवसेनेचे जिल्हाप्रमुख संजय कदम यांनी व्यक्त केला.
सध्या दापोली विधानसभा मतदारसंघातील दापोली, मंडणगड आणि खेड तालुक्यातील विविध पक्षातील उत्सुक कार्यकर्ते, पदाधिकारी आणि लोकप्रतिनिधी यांची शिवसेनेत प्रवेश करण्यासाठी गर्दी चांगलीच वाढली आहे. दापोली विधानसभा मतदारसंघातून शिवसेनेच्या तिकिटावर निवडून गेलेल्या येथील लोकप्रतिनिधींनी पक्षाची गद्दारी करुन पक्ष नेतृत्व आणि पक्षाला आव्हान दिले. ते आव्हान विधानसभा निवडणुकीत मोडून काढण्यासाठी शिवसेना (उध्दव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे सर्व शिवसैनिक सज्ज झाले आहेत, असे कदम पुढे म्हणाले.
आता दापोली विधानसभा मतदारसंघात फक्त आणि फक्त उद्धव ठाकरेंची शिवसेना असेल असा प्रबळ विश्वास जिल्हाप्रमुख संजय कदम यांनी व्यक्त केला.