
हिंदुस्थानात गेल्या काही दिवसांपासून सातत्याने विमानांना बॉम्बने उडविण्याच्या धमक्या मिळत आहेत. त्याची शहानिशा केली असता त्या अफवा असल्याचे समोर आले. या धमक्यांनी प्रवाशांमध्ये भितीचे वातावरण पसरलेच शिवाय एअरलाइन्स कंपन्यांना याची मोठी किंमत मोजावी लागत आहे. मागच्या सात दिवसांत विमानांना बॉम्बच्या 90 धमक्या मिळाल्या मात्र त्यानंतर त्या अफवा असल्याचे समोर आले. मात्र तुम्हाला माहित आहे का? फेक कॉल करुन धमकी दिल्यानंतर त्या विमानाचे किती मोठे नुकसान होते.
मीडिया वृत्तानुसार, बॉम्बच्या धमकीच्या कॉलने विमान कंपन्यांना कोट्यावधींचे नुकसान होत आहे. आतापर्यंत विमान कंपन्यांना या धमकीच्या अफवांमुळे 1500 कोटींचे नुकसान झाले आहे. तसेच धमक्यांमुळे अमेरीकेला जाणाऱ्या एका विमानाला 3 कोटींचे नुकसान झाले आहे. मीडिया वृत्तानुसार, हिंदुस्थानात यावर्षी आतापर्यंत 500 हून अधिक विमानांना धमकी मिळाली आहे. त्याचा परिणाम 2 हजार विमानांना आणि त्यातून प्रवास करणाऱ्या साडेतीन लाख प्रवाशांवर झाला आहे.
जेव्हा कधी विमानामध्ये बॉम्ब असल्याची धमकी मिळते, त्यावेळी विमानाचे संपूर्ण सिस्टम विस्कळीत होते. विमानाला तत्काळ जवळच्या विमानतळावर तत्काळ लॅण्डिंग करावे लागते. याने एटीएफसोबत विमानाची तपासणी आणि प्रवाशांना थांबण्यासाठीच्या व्यवस्थेपासून त्यांना त्यांच्या ठिकाणापर्यंत पोहोचण्यासाठी विमान कंपनीला जवळपास 3 कोटी खर्च होतो. विमान कंपनीच्या अधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार, कोणत्याही विमानाला धमकी दिल्यास त्या एअरलाइनच्या 24 तासांच्या एअर शेड्यूल सिस्टममध्ये ‘चेन रिॲक्शन’ होते. त्यामुळे विमान कंपनीचे मोठे नुकसान होत आहे.
1500 कोटींचे नुकसान म्हणजे प्रत्येक विमानामध्ये जवळपास 180 प्रवासी असातत. इकोनॉमिक्स टाइम्सच्या वृत्तानुसार, 2024 मध्ये आतापर्यंत 500 हून अधिक विमानांना धमकी मिळाल्यानंतर 2 हजार विमानांवर परिणाम झाला आहे. , आता प्रत्येक उड्डाण साखळीची प्रतिक्रिया समजून घेतली तर 3 कोटींनुसार आतापर्यंत 1500 कोटी रुपयांचे नुकसान झाले आहे.