
विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने तपासणी करताना गोरेगाव विधानसभा मतदारसंघातील आचारसंहिता भरारी पथकाने गोरेगाव पश्चिम एस. व्ही. रोडवरील जैन मंदिर येथे वाहन तपासणीदरम्यान एका कारमध्ये 6 लाख 11 हजार 820 इतकी रोख रक्कम जप्त केली. आचारसंहिता कालावधीमध्ये 50 हजार रुपये रकमेचीच वाहतूक करण्यास परवानगी आहे. त्यापेक्षा जास्त रक्कम आढळल्यास ती जप्त केली जाते. त्यामुळे या जप्त रकमेबाबत गोरेगाव पोलीस ठाणे येथे रीतसर पंचनामा करून नोटांच्या तपशिलासह ती जमा करण्यात आली. भरारी पथक यासंदर्भात पुढील कारवाई करत आहे.