मनसेला धक्का; अखिल चित्रे शिवसेनेत

महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेचे सरचिटणीस अखिल चित्रे यांनी गुरुवारी ‘मातोश्री’ निवासस्थानी शिवसेनेत (उद्धव बाळासाहेब ठाकरे) प्रवेश केला. शिवसेना नेते, युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांनी शिवबंधन बांधून त्यांचे पक्षात स्वागत केले. यावेळी शिवसेना सचिव वरुण सरदेसाईदेखील उपस्थित होते. अखिल चित्रे यांच्यासह मनविसेचे कार्यकारिणी सदस्य शैलेश पुंदर, मनविसेचे उपाध्यक्ष संतोष राणे, वांद्रे पूर्व उपविभाग अध्यक्ष सलमान खान आणि इतर कार्यकर्त्यांनीदेखील यावेळी पक्षप्रवेश केला.