रोहित शर्माने मुलाचे ‘हे’ खास नाव ठेवले, पत्नी रितिकाने शेअर केली पोस्ट

टीम इंडियाचा कर्णधार रोहित शर्मा नुकताच दुसऱ्यांदा बाबा झाला आहे. 15 नोव्हेंबरला त्यांना मुलगा झाला आणि त्यांनी त्याचे नाव ‘अहान’ ठेवले. रोहित आणि रितिका यांना समायरा मुलगी आहे. नुकतेच रोहितची पत्नी रितिकाने स्वत: तिच्या अधिकृत इंस्टाग्रामवर स्टोरी शेअर करून ही माहिती दिली आहे.

रोहित आणि रितिका यांचे 2015 रोजी विवाह बंधनात अडकले.  त्यानंतर 30 डिसेंबर 2018 रोजी दोघांना समायरा नावाची मुलगी झाली. तर 15 नोव्हेंबर 2024 रोजी रोहितला मुलगा झाला. त्याचे नाव ‘अहान’ ठेवले. ‘अहान’ हे नाव संस्कृत शब्द ‘अहा’ पासून आले आहे. याचा अर्थ ‘जागृत राहणे’ असा होतो. अहान नावाचा अर्थ आहे- पहाट, सूर्योदय, प्रकाशाचा पहिला किरण, मॉर्निंग ग्लोरी असा होतो. या नावाची व्यक्ती नेहमी शिकण्याचा आणि पुढे जाण्याचा प्रयत्न करते.

‘अहान’ च्या जन्मामुळे रोहित शर्मा बॉर्डर गावस्कर ट्रॉफीच्या पहिल्या कसोटीचा भाग होऊ शकला नाही. त्याच्या अनुपस्थितीत जसप्रीत बुमराहने पर्थ येथे खेळल्या गेलेल्या पहिल्या कसोटीत टीम इंडियाचे नेतृत्व केले. टीम इंडियाने पहिल्या कसोटीत ऑस्ट्रेलियाचा 295 धावांच्या मोठ्या फरकाने  एकतर्फी पराभव केला.