ममता कुलकर्णी 25 वर्षांनी मुंबईत परतली

90 च्या दशकात आपल्या अभिनयाने व सौंदर्याने प्रेक्षकांच्या मनावर राज्य करणारी अभिनेत्री ममता कुलकर्णी तब्बल 25 वर्षांनी मुंबईत परतली.

ममता कुलकर्णीने 2000 साली देश सोडला होता. आता इतक्या दीर्घ कालावधीनंतर मुंबईत परतल्यावर तिने इन्स्टाग्रामवर व्हिडीयो शेअर करून तिच्या भावना व्यक्त केल्या. फ्लाइट लँड होताच विमानात उंचावरून हिंदुस्थानला पाहून भारावून गेले. मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावरून बाहेर पडताना डोळ्यात अश्रू होते, असे तिने सांगितले.

 ममताने व्हिडीओच्या कॅप्शनमध्ये सांगितलं की, ती 2012 मध्ये कुंभमेळ्यात सहभागी होण्यासाठी मायदेशी आली होती. त्यानंतर आता 12 वर्षांनी ती जानेवारीच्या शेवटी प्रयागराजमध्ये होणाऱ्या पवित्र कुंभमेळ्यासाठी पुन्हा देशात परतली आहे. 12 वर्षांनी हिंदुस्थानात आणि 25 वर्षांनंतर मुंबईत आल्याचे ममताने तिच्या पोस्टमध्ये सांगितले.

2015 मध्ये अंमली पदार्थांच्या तस्करी प्रकरणात ममताचे नाव आले होते. त्यानंतर ती देश सोडून गेली होती. दोन हजार कोटी रुपयांच्या प्रकरणात ममता व तिचा पती विकी गोस्वामी यांची नावे आली होती. दोघांचा या प्रकरणात सहभाग असल्याचा आरोप झाला होता. गंभीर आरोप असूनही, ममताला अटक झाली नव्हती. अलीकडेच मुंबई उच्च न्यायालयाने तिला ‘क्लीन चिट’ देत तिच्याविरुद्धची तक्रार रद्द केली.