‘इंडिया’ आघाडीचे नेतृत्व करण्याची ममतांची मनीषा

मला संधी मिळाल्यास मी ‘इंडिया’ आघाडीचे नेतृत्व करण्यास तयार आहे. मी सक्षमपणे आघाडीचं नेतृत्व करेन. बंगालच्या बाहेर जाण्याची आपली इच्छा नाही, पण मी इथून ‘इंडिया’ आघाडी चालवू शकते, असे सांगत पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी आपली इच्छा व्यक्त केली.

मी ‘इंडिया’ आघाडीची स्थापना केली होती. आता आघाडीचे नेतृत्व करणाऱ्यांवर ती चालवण्याची जबाबदारी आहे. ते जर हे व्यवस्थित करत नसतील तर त्याला मी काय करू शकते? मी फक्त इतकेच म्हणेन की, सर्वांना सोबत घेऊन चालावे लागेल, असे ममता बॅनर्जी म्हणाल्या.

आनंदच होईल – सुप्रिया सुळे

ममता बॅनर्जी इंडिया आघाडीचा अविभाज्य भाग आहेत. लोकशाहीत विरोधी पक्षाची मोठी भूमिका आणि जबाबदारी असते. त्यामुळे त्यांना आणखी काही जबाबदारी घ्यायची असेल तर आम्हाला खूप आनंद होईल, असे राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या सुप्रिया सुळे म्हणाल्या.