
पिकनिक जात असताना स्कूलबस पलटल्याने तीन विद्यार्थ्यांचा मृत्यू झाला. तर 25 विद्यार्थी जखमी झाले. राजस्थानमधील राजसमंद जिल्ह्यात रविवारी सकाळी ही घटना घडली. जखमींना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले असून तिन्ही मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आले आहेत.
महात्मा गांधील स्कूलची पिकनिक देसूरी येथील परशुराम महादेव मंदिर येथे चालली होती. बसमध्ये 62 विद्यार्थी आणि 6 शिक्षक होते. देसूरी मार्गावर चालकाचे नियंत्रण सुटल्याने बस पलटली. यात तीन विद्यार्थिनींचा जागीच मृत्यू झाला. प्रीति, आरती आणि अनिता अशी तिघींची नावे आहेत.
बसमधील अन्य 25 विद्यार्थी जखमी झाले असून त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. तर 37 विद्यार्थ्यांना प्रथमोपचार करून घरी सोडून देण्यात आले. याप्रकरणी बस चालकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोलीस करत आहेत.