दिल्लीत रेस्टॉरन्टला भीषण आग, अग्नीशमन दलाच्या 10 गाड्या घटनास्थळी दाखल

दिल्लीतील राजौरी गार्डन परिसरात एका रेस्टॉरन्टला भीषण आग लागली. आगीची माहिती मिळताच अग्नीशमन दलाच्या 10 गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या. अग्नीशमन दलाकडून आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी शर्थीचे प्रयत्न सुरू आहेत. सोमवारी दुपारी 2 वाजता ही घटना घडली.

राजौरी गार्डन परिसरातील जंगल जहरी नामक रेस्टॉरन्टच्या पहिल्या मजल्यावर ही आग लागली आहे. आगीचे कारण अद्याप समजू शकले नाही. परिसरात धुराचे लोळ उठले आहेत. आगीत कुणी जखमी झाल्याची किंवा जीवितहानीची अद्याप माहिती नाही