
तामिळनाडूमध्ये विविध भागात पोंगलनिमित्त आयोजित जलिकट्टू स्पर्धांमध्ये एकाच दिवसात सात जणांचा मृत्यू झाला आहे. यात 400 हून अधिक जखमी झाले असून त्यांच्यावर विविध रुग्णालयात उपचार सुरू आहेत. मृतांमधील सहा जण हे जलिकट्टू पाहायला आले होते तर एक स्पर्धक होता. यात दोन बैलांचाही मृत्यू झाला आहे.
तामिळनाडूत गुरुवारी पोंगल साजरा करण्यात आला. त्यानिमित्तान राज्यभरात वेगवेगळ्या ठिकाणी जलिकट्टू स्पर्धा आयोजित करण्यात आल्या होत्या. पुडुकोट्टई, करूर आणि त्रिची जिल्ह्यांमध्ये मोठ्या प्रमाणात ही स्पर्धा खेळली गेली.