जानेवारीत मोटर वाहन विक्रीत 7 टक्के वाढ

देशात जानेवारी महिन्यात मोटर वाहनांच्या विक्रीत 7 टक्क्यांची वाढ झाली आहे. ही वाढ वार्षिक आधारावर असून जानेवारीत 22,91,621 वाहनांची विक्री झाली आहे, अशी माहिती ऑटोमोबाईल डीलर्स असोसिएशन (फाडा) ने दिली आहे. दुचाकी, तीनचाकी, प्रवासी वाहन, ट्रक्टर्ससह सर्वच गटात वाहनांची विक्री वाढली आहे. शहरी भागात 5 टक्क्यांची वाढ झाली आहे.