स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या ‘अनादी मी अनंत मी’ला ‘महाराष्ट्र प्रेरणा गीत’ पुरस्कार

छत्रपती संभाजी महाराज यांच्या नावाने या वर्षीपासून दिला जाणार पहिला ‘महाराष्ट्र प्रेरणा गीत’ पुरस्कार स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांच्या ‘अनादी मी अनंत मी…’ या गीताला जाहीर करण्यात आला आहे. राज्याचे सांस्पृतिक कार्यमंत्री अॅड. आशीष शेलार यांनी फ्रान्सच्या मार्सेलिस समुद्रकिनाऱ्यावरून या पुरस्काराची आज घोषणा केली.

महाराष्ट्र भूषण आणि अन्य सन्मानाचे पुरस्कार महाराष्ट्र शासनातर्फे देण्यात येतात त्याच पद्धतीने दरवर्षी एका प्रेरणा गीताला महाराष्ट्र शासनाच्या सांस्पृतिक कार्य विभागातर्फे ‘छत्रपती संभाजी महाराज महाराष्ट्र प्रेरणा गीत’ पुरस्कार देऊन गौरविण्यात येणार आहे. दोन लाख रुपये रोख रक्कम  व स्मृतिचिन्ह असे या पुरस्काराचे स्वरूप असेल.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ‘एक्स’च्या माध्यमातून या निर्णयाचे स्वागत केले आहे. स्वातंत्र्यवीर सावरकर यांचा उद्या आत्मार्पण दिन आहे. या गीताला राज्य सरकारच्या वतीने हा पुरस्कार देण्याचा निर्णय घेतला याचा मला आनंद होत असल्याचे म्हटले आहे.