लालू यादवांसह कुटुंबीयांना समन्स

lalu-yadav-tejasvi-yadav

दिल्लीतील एका न्यायालयाने माजी केंद्रीय रेल्वेमंत्री आणि राष्ट्रीय जनता दलाचे प्रमुख लालूप्रसाद यादव यांना ‘जमिनीच्या बदल्यात नोकरी’ घोटाळाप्रकरणी मंगळवारी समन्स बजावले आहे. विशेष न्यायाधीश विशाल गोगणे यांनी लालू यांचा मुलगा तेजप्रताप यादव आणि मुलगी हेमा यादव यांनाही समन्स बजावले. तसेच बिहारचे माजी उपमुख्यमंत्री आणि लालू यादव यांचा धाकटा मुलगा तेजस्वी यादव यांना नवीन समन्स बजावण्यात आले. सर्व आरोपींना 11 मार्च रोजी न्यायालयात हजर राहण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.