
वन्य प्राण्यांच्या देखभालीसाठी अनंत अंबानी यांच्या ‘वनतारा’ या प्रकल्पाला ‘राष्ट्रीय प्राणी मित्र’ पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. हिंदुस्थान सरकारकडून दिला जाणारा कॉर्पोरेट श्रेणीतील प्राणी कल्याण क्षेत्रातील हा देशातील सर्वोच्च सन्मान आहे. ‘राधे कृष्ण मंदिर एलिफंट वेल्फेअर ट्रस्ट’ ही वनताराची एक संस्था आहे, जी हत्तींचा बचाव आणि त्यांची देखभाल करते. वनतारा येथील एलिफंट केअर सेंटरद्वारे 240 हून अधिक हत्तींची काळजी घेतली जाते. या सेंटरमध्ये सर्कसमधील 30 हत्ती आणि लाकूड उद्योगातील 100 हून अधिक हत्ती आहेत. जामनगर येथील तीन हजार एकरच्या भव्य क्षेत्राचे जंगलात रूपांतर करत 998 एकर क्षेत्रात वनतारा हे वन्य प्राण्यांचे भव्य बचाव व पुनर्वसन केंद्र उभारण्यात आले आहे. येथे हत्तींना मुक्तपणे फिरण्याची मुभा आहे. सरकारने वनताराला प्रतिष्ठित पुरस्कार देऊन सन्मान केल्याने वनताराचे सीईओ विवान करणी यांनी कृतज्ञता व्यक्त केली.