
जागृती मंच आणि वरळी विधानसभेचे उपविभागप्रमुख राम साळगावकर यांच्या नेतृत्वाखाली घेण्यात आलेल्या स्पर्धा महोत्सवातील बाल चित्रकला स्पर्धेला शिवसेना नेते, युवासेना प्रमुख-आमदार आदित्य ठाकरे यांनी उपस्थित राहत स्पर्धकांनी रेखाटलेल्या चित्रांसाठी त्यांचे कौतुक केले तसेच विजेत्यांना पारितोषिकही दिले. स्पर्धेत 1600 बाल स्पर्धक सहभागी झाले होते. स्पर्धेला मिळालेला प्रतिसाद आणि नियोजन पाहून आदित्य ठाकरे यांनी जागृती मंचचे कौतुक केले.
जागृती मंचने आयोजित केलेल्या स्पर्धा महोत्सवामधील चित्रकला स्पर्धेतील विजेत्या स्पर्धकांचा आदित्य ठाकरे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. त्याचबरोबर सामाजिक कार्यकर्ते आणि 105 वेळा रक्तदान करणाऱ्या डॉ. प्रागजी वाजा यांचाही आदित्य ठाकरे यांच्या हस्ते शाल, श्रीफळ आणि सन्मानचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला. स्पर्धेमध्ये इयत्ता पहिली आणि दुसरी, तिसरी आणि चौथी, पाचवी व सहावी, सातवी ते आठवी, नववी ते दहावी अशा पाच गटांमध्ये आयोजित करण्यात आली होती. प्रत्येक गटातील पहिल्या सहा विजेत्या स्पर्धकांना रोख रक्कम आणि सन्मानचिन्ह देऊन गौरवण्यात आले. दरम्यान, यावेळी 12 शाळांमधील विद्यार्थ्यांनी समूह नृत्य सादर केले. यावेळी शिवसेना उपनेते, भारतीय कामगार सेनेचे सरचिटणीस आमदार सचिन अहिर, आमदार सुनील शिंदे, माजी महापौर किशोरी पेडणेकर, विभागप्रमुख आशीष चेंबूरकर आदी उपस्थित होते.
स्पर्धा यशस्वी होण्यासाठी स्पर्धाप्रमुख चंद्रकांत गावडे, महादेव दोरुगडे, मंचाचे सचिव विष्णू कनेरकर, सुभाष सावंत, ओमकार साळगावकर, अनिल जाधव, अनिल पाटकर, संदीप पाटणकर, महेश कनेरकर, अमर साळवी, कुश पाटील, गौतम कांबळे, विश्वास पाटील, दीपक आजगेकर, संतोष आकेरकर, संजय पाटील, चाळोबा पाटील, सतीश होडके, शंकर गाढवे त्याचप्रमाणे जागृती मंचाच्या युवा ब्रिगेडचा सहभाग होता.