
राजस्थानमध्ये उदयपूरच्या सज्जनगड बायोलॉजिकल पार्कमध्ये गुरुवारी दुपारी भीषण आग लागली आहे. आगीचे वृत्त कळताच अग्नीशमन दलाच्या 14 गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या आहेत. अग्नीशमन दलाकडून आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी शर्थीचे प्रयत्न सुरू आहेत.
जोरदार वाऱ्यामुळे आग मोठ्या प्रमाणात पसरत आहे. जंगलाला आग लागताच सज्जनगड मान्सून पॅलेस आणि पार्कमधील 50 पर्यटकांना सुखरूप बाहेर काढण्यात आले आहे, असे विभागीय वन अधिकारी सुनील सिंग यांनी सांगितले. आगीची घटना घडताच पर्यटकांना आत प्रवेश करण्यास रोखण्यासाठी पार्कमधील तिकिट बुकिंग विंडो तात्काळ बंद करण्यात आली.