कुलाबा-सीप्झ मेट्रो जूनपासून धावणार

देशातील सर्वात मोठी भुयारी मेट्रो म्हणून ओळखली जाणारी कफ परेड ते सीप्झपर्यंतची मेट्रो रेल्वे सेवा जून 2025 पासून सुरू होईल, अशी माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज विधानसभेत दिली. 2014 ते 2019 या काळात दहा मेट्रो लाईनला मान्यता दिली आहे. त्यातील काही मेट्रो लाईन्स सुरू झाल्यात, काही अंतिम टप्प्यात आहेत, तर काहींचे बांधकाम सुरू आहे, असे मुख्यमंत्री म्हणाले.