
रोम जळत होता तेव्हा निरो फिडेल वाजवत होता त्याचप्रमाणे नागपूर पेटवून सरकार पार्ट्या करत आहे, अशी तोफ काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी आज डागली. नागपूरमध्ये हिंसाचारामुळे तणाव आणि भीतीचे वातावरण असताना आज विधान भवनाच्या हिरवळीवर दोन्ही सभागृहांच्या प्रमुखांनी संगीत रजनी आणि स्नेहभोजन ठेवले होते तर उद्या मंत्री नितेश राणे यांनी वानखेडे स्टेडियम येथील एमसीए द लाऊंज येथे मंत्री आणि आमदारांसाठी पार्टी ठेवली आहे. त्यावरून सपकाळ यांनी संताप व्यक्त केला.
नागपूर पेटवून सरकार पार्ट्या करत आहे. आपल्या विखारी आणि प्रक्षोभक वक्तव्यांनी महाराष्ट्राची सामाजिक शांतता व सलोखा बिघडवणाऱ्या मंत्र्याने राज्य सरकारच्या मंत्री आणि आमदारांसाठी पार्टी ठेवली आहे, अशी तोफ सपकाळ यांनी डागली. याआधी राज्यातील कायदा आणि सुव्यवस्थेवरूनही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना लक्ष्य करताना फडणवीस हे औरंगजेबासारखेच क्रूर शासक आहेत, असा हल्ला सपकाळ यांनी चढवला होता.


























































