
दीर्घकाळ प्रलंबित असलेल्या ‘मुंबई मेट्रो-2 बी’च्या मार्गावर लवकरच प्रवासी सेवा सुरू होणार आहे. या मार्गावरील चेंबूर-डायमंड गार्डन ते मंडाले-मानखुर्द स्थानकांदरम्यान बुधवारी (16 एप्रिल) मेट्रोची चाचणी अर्थात ट्रायल रन केली जाणार आहे. 5.4 किमीच्या या मार्गावर पाच स्थानके आहेत.
मुंबईत पहिल्यांदा रेल्वे धावली, त्याच्या 172 व्या वर्धापन दिनाचे औचित्य साधून बुधवारी ‘मेट्रो-2बी’ची चाचणी सुरू केली जाणार आहे. चेंबूर-डायमंड गार्डन ते मंडाले-मानखुर्द यादरम्यान डायमंड गार्डन, शिवाजी चौक, बीएसएनएल मेट्रो, मानखुर्द आणि मंडाले ही पाच स्थानके आहेत. ही येलो मार्गिका चेंबूर येथे मोनोरेल मार्गिकेशी जोडली जाते. त्यामुळे मुंबईकरांना मेट्रो मार्गिकेवरून मोनोरेलच्या प्रवासासाठी जाणे सुकर होणार आहे. भारत अर्थ मूव्हर्स लिमिटेडने तयार केलेल्या सहा कोचच्या मेट्रो गाडय़ा येलो मार्गिकेवर धावणार आहेत.
z येलो मार्गिकेवर धावणाऱया मेट्रो ट्रेन वैशिष्ट्यपूर्ण असतील. या ट्रेनमध्ये प्रवाशांना सायकलसोबत नेण्यासाठीही जागेची व्यवस्था केली आहे. तसेच मोबाईल चार्ंजग पॉइंट्स, आयपी आधारित उद्घोषणा प्रणाली, प्रवासी सुरक्षेसाठी आधुनिक नियंत्रण प्रणाली यांचा अतिरिक्त सुविधांमध्ये समावेश असणार आहे.