
धनंजय मुंडे यांनी निवडणुकीत विजयासाठी अनुचित प्रकार केले, जवळपास दोनशे पन्नास बूथ ताब्यात घेतले असा आरोप या पूर्वीच त्यांचे प्रतिस्पर्धी शरद पवार गटाचे पराभूत उमेदवार राजेसाहेब देशमुख यांनी केला होता. त्यातच निलंबित पोलीस उपनिरीक्षक रणजित कासले याने आज पुणे विमानतळावर धनंजय मुंडे यांनी मतदान यंत्रापासून दूर राहण्यासाठी आपल्या खात्यावर दहा लाख रुपये टाकल्याचा गंभीर आरोप केल्यानंतर या मुद्दय़ावरून राजेसाहेब देशमुख पुन्हा सक्रिय झाले आहेत.
त्यांनी या आरोपाला पुरावा ग्रहीत धरून धनंजय मुंडे यांच्या निवडीला न्यायालयात आव्हान देणार आहेत. ते म्हणाले, जर एका कासलेना दहा लाख रुपये दिले असतील तर अजून इतर किती जणांना किती रुपये दिले असतील याची चौकशी झाली पाहिजे, असे ते म्हणाले.