
>> वैष्णवी ठिगळे
वातावरणातला उष्मा वाढला की काही खावेसे वाटत नाही. कारण उन्हाळ्यात पचनसंस्था कमकुवत होते आणि भूक मंदावते. शरीराला थंडावा मिळण्यासाठी आहारात हलके, पचायला सोपे आणि पाण्याचे प्रमाण जास्त असलेले पदार्थ घेतले पाहिजेत. सकस, ताजे आणि स्थानिक पदार्थांचा समावेश करून शरीराचे तापमान संतुलित ठेवण्यासाठी आहारात थोडासा बदल करून आपण उन्हाळ्याच्या त्रासांपासून स्वतचे संरक्षण करू शकतो.
उन्हाळा म्हटला की प्रचंड उष्णता, घाम, थकवा आणि शरीरातील पाण्याची कमतरता ही सामान्य पार असते. यामुळे डोकेदुखी, अपचन, चक्कर, घशाला कोरड पडणे, अशक्तपणासारख्या त्रासांना अनेकांना सामोरे जावे लागते. या त्रासांपासून दूर राहण्यासाठी आहारात योग्य बदल आणि काही घरगुती उपायांचा अवलंब करणे गरजेचे आहे. यामुळे शरीर आतून थंड राहायला मदत होते आणि उन्हाळय़ापासून बचावही होतो.
तर पाहूयात उन्हाळ्यात शरीराला थंडावा देणारे खाद्यपदार्थ
थंडावा देणारी फळे : कलिंगड, खरबूज, द्राक्ष, संत्री, नारळ, आवळा ही फळे शरीराला हायड्रेट ठेवतात आणि उष्णतेचा परिणाम कमी करतात. आवळा अँटिऑक्सिडंट्सने भरलेला असून त्वचेला थंडावा देतो.
चिया सीड्स आणि सब्जा : चिया सीड्स आणि सब्जा (तुळशीच्या बिया) हे दोन्ही शरीरात थंडावा निर्माण करतात. सब्जा सरबतामध्ये भिजवून प्यायल्यास उष्णता कमी होते. चिया सीड्स दुधात, ताकात किंवा लिंबूपाण्यात घालून घेता येते.
सत्तू आणि जवस : सत्तू हे नैसर्गिक प्रोटीनचा स्त्राsत असून शरीराला ऊर्जा देते व उष्णता टिकवून ठेवण्यास मदत करते. जवस (त्aिxsााds) हेदेखील थंड गुणधर्म असलेले बीज आहे.
दही आणि ताक : दह्यापासून मिळणारे प्रोबायोटिक म्हणजेच गुड बाक्टेरिया आरोग्यासाठी पोषक असून त्याने पचनसंस्था सुधारते. ताक हे घरगुती थंड पेय आहे जे शरीरातील उष्णता कमी करते.
नैसर्गिक सरबते : आंब्याचे पन्हे, बेल सरबत, गुलकंद, लिंबूपाणी, नारळपाणी ही सरबते नैसर्गिकरीत्या इलेक्ट्रोलाइट्सचा समतोल राखणारी आहेत.
उन्हाळ्यात उपयोगी ठरणारे घरगुती उपाय
- लिंबू, सैंधव मीठ व मिरपूड टाकून लिंबूपाणी घेतल्यास उष्णतेने आलेला थकवा, मरगळ व अशक्तपणा दूर होतो.
- कैरीचे पन्हे उष्णतेपासून संरक्षण करते. त्यात जिरे, गूळ व सैंधव मीठ घातल्यास ते अधिक परिणामकारक बनवता येते.
- तुळशीचा काढा थंड करून प्यावा. तुळशी उष्णतेच्या दुष्परिणामांना विरोध करते.
- गुलकंद हे शरीराला थंड ठेवणारे आयुर्वेदिक घटक आहे. विशेषत त्वचा आणि पचनासाठी उपयुक्त आहे.
- काकडी आणि दही यांच्या मिश्रणाचा फेस मास्क त्वचेला थंडावा देतो आणि उन्हाळय़ात येणाऱया (पुरळ) रॅशेसपासून बचाव करतो.
उन्हाळय़ात मसालेदार पदार्थ नकोसे वाटतात. तसेच ते पचायला जड असतात. अशा वेळी हलका आरोग्यदायी आहार बरा वाटतो. त्यामुळे उन्हाळय़ात टाळावे असे काही खाद्यपदार्थ म्हणजे मसालेदार, तळलेले आणि तेलकट पदार्थ तसेच कोल्ड्रिंक्स,
कॅफिनयुक्त पदार्थ (कॉफी, कोक वगैरे) तसेच जड अन्न व उष्णतेचे उत्पादन करणारे पदार्थ जसे की मेथी, गरम मसाले हे टाळावेत.
उन्हाळ्यात पाणी पिण्याचे प्रमाण जास्त असावे. हलके आणि थंड गुणधर्म असलेले पदार्थ खाणे आवश्यक आहे. काही ल्हिम्tग्दहत् दिदे् आणि घरगुती उपाय अमलात आणून आपण शरीराला नैसर्गिक थंडावा देऊ शकतो. यामुळे नुसती उष्णतेची पार कमी होत नाही, तर आजार दूर राहून एकूण आरोग्य टिकून राहते.
(लेखिका आहारतज्ञ आहेत.)