
प्रगत, उदयोन्मुख अशा भविष्यवेधी क्षेत्रांमध्ये मुंबईच्या इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीसह (आयआयटी) संशोधनाची संधी मुंबई विद्यापीठाला मिळणार आहे. केंद्र सरकारच्या केअर या उपक्रमाअंतर्गत मिळणाऱ्या या संधीबरोबरच संशोधनाकरिता या शिक्षण संस्थांना 100 कोटी रुपयांचे पाठबळही मिळाले आहे. पुढील पाच वर्षांकरिता हा निधी उपलब्ध करून दिला जाईल. राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 2020 च्या अंतर्गत ‘अनुसंधान नॅशनल रिसर्च फाऊंडेशन’द्वारे सुरू करण्यात आलेल्या ‘पार्टनरशिप्स फॉर एक्सिलरेटेड इनोव्हेशन अँड रिसर्च’ उपक्रमात मुंबई विद्यापीठाचा समावेश करण्यात आला आहे. यातील आयआयटी-मुंबई या निवडलेल्या ‘हब’अंतर्गत विद्यापीठ संशोधन करेल.