
अंधेरी येथे आज सकाळी बेस्टच्या भाडेतत्त्वावरील बसला दुचाकीस्वाराने धडक दिली. धडक दिल्यानंतर बस त्याच्या हातावरून गेली. दुचाकीस्वाराला जवळच्या होली क्रॉस रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. याप्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. बस आगरकर चौकातून महाकाली गुंफा येथे जात होती. नेल्को सिग्नल येथे समोरच्या गल्लीतून बेदरकारपणे आलेल्या इस्माईल सुरतवाला (35) या दुचाकीस्वाराने बसच्या उजवीकडच्या मागील बाजूस धडक दिली.