
जगातील पाचवे श्रीमंत व्यक्ती आणि दिग्गज गुंतवणूकदार वॉरेन बफे यांनी अचानक 40 हजार शेअरधारकांच्या उपस्थितीत निवृत्तीची घोषणा केली. त्यामुळे साऱ्यांना आश्चर्याचा धक्का बसला. गुंतवणूकदारांनी बफे यांच्या निर्णयाचे उभे राहून टाळ्या वाजवत स्वागत केले.
वयाच्या 94 व्या वर्षी वॉरेन बफे यांनी बर्पशायर हॅथवे ब्रेक्झ. एन कंपनीच्या सीईओ पदावरुन पायउतार होत असल्याचे जाहीर केले. ओमाहामध्ये वार्षिक बैठकीत ते म्हणाले, मला वाटतंय की कंपनीला नवा मुख्य कार्यकारी अधिकारी मिळायला हवा, आता वेळ आलीय की या वर्षाच्या अखेरीस या पदावरुन निवृत्त होईल. वॉरेन बफे 2025 च्या शेवटी बर्पशायर हॅथवे सोडतील, अशी चर्चा आहे.
उत्तराधिकारी कोण
वॉरेन बफे यांनी बर्कशायर हॅथवेमधून निवृत्ती जाहीर केलेली आहे, त्याचवेळी त्यांनी उत्तराधिकारी कोण असेल याचा सस्पेन्स देखील संपवला आहे. 2025 च्या अखेरीस ग्रेग एबेल यांनी जबाबदारी स्वीकारायला हवी, असे ते म्हणाले. ग्रेग एबेल सध्या या कंपनीत उपाध्यक्ष पदावर कार्यरत आहेत. वॉरेन बफेनंतर ते सीईओ होतील. ग्रेग एबेल यांचं वय 62 वर्ष असून ते 2018 पासून बर्कशायरचे उपाध्यक्ष आहेत.