
हिमाचल प्रदेशातील धर्मशाला येथे पहिल्यांदाच युरोपियन रेड अॅडमिरल फुलपाखरू दिसले. फुलपाखरू तज्ञ लविश गरलानी यांनी थाथरना हिल टॉपवर 2500 मीटर उंचीवर हे दुर्मीळ फुलपाखरू पाहिले. युरोपियन रेड अॅडमिरल फुलपाखरू सामान्यतः उत्तर अमेरिका आणि मध्य आशियामध्ये आढळते. दक्षिण आशियात, ते पहिल्यांदा 1929 मध्ये बलुचिस्तानमध्ये दिसले. त्यानंतर, 93 वर्षांनंतर, 2022 मध्ये, ते पुन्हा पाकिस्तानच्या चित्राल भागात दिसले. चीन, मंगोलिया किंवा अफगाणिस्तानमध्ये फुलपाखरांची नोंद झालेली नाही. हे फुलपाखरू इंडियन रेड अॅडमिरलसारखे दिसते. पण इंडियन रेड अॅडमिरलच्या पंखावर दिसणारा विशिष्ट ठिपका या हिंदुस्थानी प्रजातीमध्ये नाही. बिच्छू बूटीवर ही फुलपाखरे वाढतात. बिच्छू बूटी ही वनस्पती पश्चिम हिमालयात मोठ्या प्रमाणात आढळते.