
‘देसी गर्ल’ प्रियांका चोप्रा ही पाचव्यांदा मेट गालाच्या रेडकार्पेटवर दिसली. या वेळी ती बालमेनचे क्रिएटिव्ह डायरेक्टर ओलिवियर रोस्टिंगसोबत दिसली. सर्वात जास्त वेळा या इव्हेंटला उपस्थित राहणारी प्रियांका चोप्रा ही हिंदुस्थानी कलाकार ठरली आहे. याआधी प्रियांका 2017, 2018, 2019, 2023 मध्ये उपस्थित राहिली होती, तर दीपिका पादुकोनही तीन वेळा 2017, 2018, 2019 मध्ये उपस्थित राहिली आहे. प्रियांका आणि दीपिकासोबत आलिया भट्ट हीसुद्धा दोन वेळा 2023 आणि 2024 मध्ये मेट गालाच्या रेडकार्पेटवर दिसली आहे. मेट गाला हा इव्हेंट फॅशन शो जगतातील सर्वात मोठा कार्यक्रम समजला जातो.