मेट्रो प्रवाशांची व्हॉट्सअ‍ॅप तिकिटाला पसंती

प्रवाशांना तिकिटाच्या रांगेत उभे राहण्याची गरज भासू नये तसेच पर्यावरणाचे संवर्धन व्हावे यासाठी महामुंबई मेट्रोने व्हॉट्सअ‍ॅप तिकीट सेवेला सुरुवात केली होती. या सेवेला प्रवाशांचा भरघोस प्रतिसाद मिळत असून आज एका दिवसात 51 हजार 991 व्हॉट्सअ‍ॅप तिकिटाची नोंद झाली. 11 ऑक्टोबर 2024 रोजी व्हॉट्सअ‍ॅपद्वारे तिकीट काढण्याची सेवा सुरू झाल्यानंतर प्रवाशांनी या पर्यायाचा मोठय़ा प्रमाणावर अवलंब केल्याचे यावरून दिसत असून डिजिटल पर्याय स्वीकारल्यामुळे पर्यावरण रक्षणात मोठा हातभार लागत आहे. सध्या मेट्रोच्या दररोजच्या एकूण प्रवाशांपैकी 65 टक्के प्रवासी आता डिजिटल तिकिटांचा वापर करत आहेत. त्यामुळे कागदी तिकिटांचा वापर 65 टक्क्यांवरून 35 टक्क्यांपर्यंत घटला आहे.