संरक्षण शेअर्समध्ये रॉकेट तेजी; ड्रोन कंपनीचे शेअर्स 20 टक्क्यांपर्यंत वाढले

युद्धजन्य परिस्थितीत शुक्रवारी सकाळी शेअर बाजार खुला होताच संरक्षण संबंधित शेअर्समध्ये वाढ झाली. ड्रोन तयार करणारी कंपनी आयडियाफोर्ज टेक्नॉलॉजी लिमिटेडचे शेअर तर 20 टक्क्यांपर्यंत वाढले.

भारत डायनॅमिक्स लिमिटेडचे शेअर्स 9.73 टक्क्यांनी, पारस डिफेन्स अँड स्पेस टेक्नॉलॉजीज लिमिटेडचे 5.89 टक्क्यांनी, भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेडचे 4.88 टक्क्यांनी, गार्डन रीच शिपबिल्डर्स अँड इंजिनीअर्स लिमिटेडचे 3.63 टक्क्यांनी आणि हिंदुस्थान एरोनॉटिक्स लिमिटेडचे शेअर्स 3.60 टक्क्यांनी वधारले. हिंदुस्थानी लष्कराने ड्रोन हल्ले प्रभावीपणे परतवले. त्यामुळे ड्रोन उत्पादक कंपन्यांचे शेअर्स तेजीत होते. ड्रोन उत्पादक आयडियाफोर्ज टेक्नॉलॉजी लिमिटेडचे 18 टक्क्यांनी आणि ड्रोनाचार्य एरियल इनोव्हेशन्स लिमिटेडचे 4.99 टक्क्यांनी वधारले.

शुक्रवारी सकाळी भारत डायनॅम्सिकच्या शेअरमध्ये 3.31 टक्के वाढ झाली. हिंदुस्थान एरोनॉटिक्सच्या शेअरमध्ये 2.34 टक्के वाढ झाली. याशिवाय पारस डिफेन्स अँड स्पेस टेक्नॉलॉजी, भारत इलेक्ट्रॉनिक्स, माझगाव डॉक शिपबिल्डर्स, ऍस्ट्रा मायक्रोवेव्ह आदी कंपन्यांचे शेअर वधारले.