हिंदुस्थाननं जिरवली, तरी पाकिस्तानला युद्धाची खुमखुमी; सैन्य LoC वर आणण्यास सुरुवात, परिस्थिती चिघळण्याचे संकेत

पहलगाम हल्ल्याचा बदला घेत हिंदुस्थानने ‘ऑपरेशन सिंदूर’ सुरू केले आणि पाकिस्तान, पीओकेमध्ये घुसून दहशतवादी तळ नष्ट केले. यामुळे बिथरलेल्या पाकिस्ताने 8 आणि 9 मेच्या रात्री ड्रोन्स आणि क्षेपणास्त्राने हल्ला करण्याचा प्रयत्न केला. हा हल्ला हिंदुस्थानने परतवून लावला. यामुळे अधिकच चेकाळलेल्या पाकिस्तानने 9 आणि 10 मेच्या रात्री अत्याधुनिक क्षेपणास्त्र डागली. या क्षेपणास्त्रांच्याही हिंदुस्थानने हवेतच चिंधड्या केल्या आणि पाकिस्तानमधील अनेक हवाई तळ उद्ध्वस्त केले.

हिंदुस्थानने एवढी जिरवली तरीही पाकिस्तानची युद्धाची खुमखुमी काही कमी झालेली नाही. नियंत्रण रेषेवरही पाकिस्तानची आगळीक सुरुच आहे. शस्त्रसंधींचे उल्लंघन करणाऱ्या पाकिस्तानने आता सैन्य नियंत्रण रेषेजवळ आणण्यास सुरुवात केली आहे. परराष्ट्र मंत्रालय आणि संरक्षण मंत्रालयाच्या संयुक्त पत्रकार परिषदेमध्ये विंग कमांडर व्योमिका सिंह यांनी ही माहिती दिली. यामुळे तणाव आणखी वाढण्याची शक्यता आहे.

पाकिस्ताने नियंत्रण रेषेजवळ सैन्याची जमावाजमव सुरू केली आहे. पाकिस्तानची ही कृती आक्रमक हेतूने असून तणाव वाढवणारी आहे. पाकिस्तानच्या कोणत्याही नापाक कृत्याला प्रभावी प्रत्युत्तर देण्यासाठी हिंदुस्थानी लष्कर सज्ज आहे. शत्रूच्या प्रत्येक कृतीला प्रभावीपणे उत्तरही देण्यात आलेला आहे. मात्र पाकिस्तानने योग्य प्रतिसाद दिला तर तणाव कमी करण्याचा प्रयत्न हिंदुस्थानकडून करण्यात येईल, असेही व्योमिका सिंह यांनी स्पष्ट केले.

India Pakistan War – नूरखान, रफिकी, मुरीद आणि रहीम यार खान एअरबेस हिंदुस्थानने उडवले; पाकिस्तानला जबरदस्त तडाखा