
काँग्रेसमुक्त हिंदुस्थान करता करता भाजप काँग्रेसयुक्त झाला, अशी घणाघाती टीका महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी केली आहे. X वर एक पोस्ट करत त्यांनी ही टीका केली आहे.
आपल्या X पोस्टमध्ये हर्षवर्धन सपकाळ म्हणाले आहेत की, “काँग्रेसचे कार्यकर्ते फोडा अशी भूमिका भाजपचे प्रदेशाध्यक्ष जाहीर व्यक्त करत आहेत. पण काँग्रेसमुक्त हिंदुस्थान करता करता भाजप काँग्रेसयुक्त झाला आहे, हे त्यांनी अगोदर लक्षात घ्यावे. अनेक जण अडचणीमुळे भाजप पक्षात जात असले तरी अजूनही काँग्रेस संपलेली नाही यातून त्यांनी काहीतरी बोध घ्यावा.”