
महाराष्ट्र सरकारने आज ब्लॅकस्टोन समूहाच्या एक्सएसआयओ लॉजिस्टिक्स पार्क्स आणि होरायझन इंडस्ट्रियल पार्क्सशी सामंजस्य करार केला. त्या करारानुसार हा समूह राज्यात 5127 कोटी रुपयांची गुंतवणूक करणार असून त्यातून 27510 रोजगाराच्या संधी उपलब्ध होतील असा दावा करण्यात आला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत सह्याद्री अतिथीगृह येथे उद्योग सचिव डॉ. पी. अन्बलगन आणि होरायझन इंडस्ट्रियल पार्क्सचे अध्यक्ष आर. के. नारायणन यांच्या स्वाक्षरीने हा करार झाला. या करारानुसार नागपूर, भिवंडी, चाकण, सिन्नर, पनवेल आदी दहाहून अधिक आधुनिक औद्योगिक व लॉजिस्टिक्स पार्क्स उभारले जातील. यासाठी 794.2 एकर जमीन देण्यात येणार आहे.