
हिंदुस्थानचा भालाफेकपटू ‘गोल्डन बॉय’ नीरज चोप्रा याला हिंदुस्थानी लष्करात बढती देण्यात आली आहे. टेरिटोरियल आर्मीत त्याला लेफ्टनंट कर्नल ही रँक मिळाली असून तो यापूर्वी सुभेदार या पदावर होता. 26 ऑगस्ट 2016 रोजी ज्युनियर कमिशन्ड ऑफिसरच्या रूपात नायब सुभेदार रँकसह तो आर्मीत सहभागी झाला होता. नीरज चोप्राने टोकियो ऑलिम्पिकमध्ये सुवर्ण पदकाची कमाई करत इतिहास रचला होता.