
मालाड बस डेपोतील बस मार्वे बस डेपोजवळ येताच बसने पेट घेतला. बसमध्ये गॅसगळती झाल्यामुळे ही बस भस्मसात झाली. या घटनेत कोणीही जखमी झाले नसून अग्निशमन दलाच्या जवानांनी वेळीच घटनास्थळी धाव घेत आगीवर नियंत्रण मिळवले.
मालाड बस डेपोतील बस मार्ग क्रमांक 272 ही सीएनजी बस आज सकाळी सुमारे 8 वाजून 12 मिनिटाला मार्वे बस डेपोजवळ आली. यावेळी बसमध्ये गॅसगळती झाली आणि इंजिनमध्ये आगीचा भडका उडाला. घटनेनंतर अग्निशमन दलाच्या जवानांनी घटनास्थळी पोहोचत दोन बंबांच्या सहाय्याने आगीवर नियंत्रण मिळवले.