
सकाळी उठल्यावर काय प्यावं याकरता सध्या सर्वाधिक चर्चा घडताना दिसते. परंतु सकाळी उठल्यावर शरीराला दिवसभर उर्जा हवी असल्यास, आपल्या सकाळची सुरुवातही तितकीच चांगली होणं हे गरजेचं आहे. सकाळी उठल्यानंतर अनेकजण नाश्त्याआधी सुकामेवा खातात. परंतु अनेकजणांना सुका मेवा खाण्यापेक्षा इतर नाश्ता करण्यात अधिक इंटरेस्ट असतो. परंतु सुका मेवा हा आरोग्यासाठी खूपच गुणकारी मानला जातो. सुका मेव्यातील बदामामध्ये सर्वात अधिक लो फॅट असते. तसेच बदामामध्ये प्रथिने अधिक असल्याने शरीराला उपयुक्त ठरते. बदामाच्या सेवनाने स्मरणशक्ती वाढते व डोळे तेजस्वी होण्यास मदत होते. त्यामुळे बदामाचे सेवन आपल्या रोजच्या आहारात घेणे महत्वाचे आहे.
बदामाचे दूध हे आपल्या स्वास्थ्यासाठी खूप फायदेशीर आहे. जर आपण रोज नियमित बदाम किंवा बदामाचे दूध घेतले तर शरीरातील अधिक समस्या दूर होतील. कारण बदामामध्ये कॅल्शियम, मॅगनेशियम, मॅंगेनिज, व्हिटॅमिन के, व्हिटॅमिन ई हे घटक असून ते आपल्या शरीरासाठी उपयुक्त मानले जातात.
बदाम दूध पिण्याचे फायदे
मजबूत स्नायूंसाठी बदामाचे दूध देखील प्रभावी ठरू शकते. बदामाच्या दुधात कॅल्शियम आणि मॅग्नेशियम भरपूर असते. कॅल्शियम स्नायूंना आराम देऊ शकते आणि वेदनापासून आराम देऊ शकते. त्याच वेळी मॅग्नेशियम स्नायूंचे कार्य सुधारते आणि जास्त काळ काम करण्याची क्षमता प्रदान करते.
बदामाच्या दुधाचे सेवन कर्करोगाच्या आजारापासून संरक्षण करण्यासाठी प्रभावी ठरू शकते.
बदामाच्या दुधात भरपूर प्रमाणात व्हिटॅमिन-ई आढळते आणि कॅन्सरच्या समस्येवर मात करण्यासाठी व्हिटॅमिन-ई एक चांगला अँटिऑक्सिडेंट मानला जातो. यामध्ये आढळणारा टोकोट्रिएनॉल्स नावाचा घटक कॅन्सर रोखण्यासाठी काम करू शकतो. यासोबतच, ट्यूमर-विरोधी गुणधर्मांमुळे, ते कर्करोगाच्या ट्यूमरच्या वाढीस प्रतिबंध करते.
वजन कमी करण्यासाठी बदामाचे दूध फायदेशीर ठरू शकते. याचे मुख्य कारण म्हणजे त्यात कॅलरीजचे प्रमाण कमी आहे. 240 मिली बदामाच्या दुधात फक्त 30 ते 50 कॅलरीज असतात, तर डेअरी दुधात 146 कॅलरीज असतात.
बदामाचे दूध हृदयासाठी फायदेशीर ठरू शकते. डोळ्यांशी संबंधित कोणत्याही समस्येने त्रस्त असाल तर, बदामाचे दूध प्रभावी औषध म्हणून काम करू शकते. वास्तविक, त्यात रिबोफ्लेविन तसेच व्हिटॅमिन-ए आणि व्हिटॅमिन-डी (४) असते. रिबोफ्लेविन मोतीबिंदू सारख्या डोळ्यांच्या समस्यांवर मात करण्यास मदत करू शकते.
(कोणतेही उपाय करण्याआधी तज्ज्ञांचा सल्ला घेणे आवश्यक आहे.)