
सिंधुदुर्ग जिह्यातील मालवण तालुक्यातील पेंडुर या गावातील न्यू इंग्लिश स्कूलमध्ये शिकणाऱया साक्षी पेंडुरकर आणि श्रुती पेंडुरकर या जुळय़ा बहिणींना दहावीच्या परीक्षेत मार्कदेखील जुळेच मिळाले आहेत. दोघींना 91.20 टक्के असे समान गुण मिळाले आहेत.
दहावीच्या परीक्षेत न्यू इंग्लिश स्कूल या शाळेचा निकाल शंभर टक्के लागला आहे. प्रथम श्रेणीत पाच तर द्वितीय श्रेणीत दोन, विशेष प्रावीण्य श्रेणीत 13 विद्यार्थी असे 20 विद्यार्थी घवघवीत यश मिळवून उत्तीर्ण झाले आहेत. गावातील पोतदार शाळेतील भव्य सावंत याला 95.6 टक्के गुण मिळाले. ऋतुजा परब हिला 86.80 टक्के तर निधी सरमळकर हिला 86.40 टक्के गुण मिळाले.
शिवसेनेतर्फे या गुणवंत विद्यार्थ्यांचा काwतुक सोहळा माजी आमदार वैभव नाईक यांच्या हस्ते रविवार, 25 मे रोजी सकाळी 11 वाजता शाळेच्या सभागृहात आयोजित केला आहे. यावेळी सुरेश सावंत, शरद पटेल, पेंडुर देवस्थानचे अध्यक्ष महेश सावंत, डॉ. सावंत, डॉ. सोमनाथ परब, संस्थाध्यक्ष बाबाराव राणे, सचिव घनःश्याम राणे, मुख्याध्यापक सुरेश तावडे, शाखाप्रमुख नीलेश हाडकर व गावातील प्रतिष्ठत उपस्थित राहतील. या सोहळय़ात शिक्षकांचादेखील सत्कार करण्यात येणार आहे. या कार्यक्रमाचे आयोजन सौख्य परिवार आणि प्रबोधन सेवा स्मृती संस्था, मालाड यांचे अध्यक्ष माजी नगरसेवक, मालाड विधानसभा प्रमुख अशोक पटेल यांनी केले आहे.