
पावसाळा सुरु झाल्यावर, घरामध्ये माश्या येण्याचे प्रमाण वाढते. माश्या घरात आल्यामुळे, घरातील अन्नपदार्थांवर बसतात. त्यामुळे असे अन्नपदार्थ खाणे आरोग्यासही अपायकारक असते. त्यामुळेच या माशांचा कायमचा बंदोबस्त करण्यासाठी आपल्याला काही घरगुती उपायांचा अवलंब करणे क्रमप्राप्त असते. घाणीतील माशा घरात आल्यावर, अनेक रोगांचा प्रादुर्भाव होण्याची शक्यता वाढते. म्हणूनच माशांपासून सुटका करण्याचे काही घरगुती उपाय आपण बघुया. जेणेकरुन घरातून माशाही जातील आणि घरदेखील स्वच्छ होईल.
कापूर : कापूरचा वापर माशांपासून सुटका करण्यासाठी करू शकता. यासाठी 10-12 कापूर वड्या घ्या आणि बारीक वाटून पावडर बनवा. नंतर ते एक लिटर पाण्यात मिसळून द्रावण तयार करून स्प्रे बाटलीत भरा. त्यानंतर घरातील ज्या ठिकाणी माश्या जास्त दिसतात त्या ठिकाणी फवारणी करावी.
तुळस : घरातील माशा दूर करण्यासाठी तुळशीची पाने देखील उपयुक्त ठरू शकतात. यासाठी तुळशीची काही पाने घेऊन बारीक वाटून त्याची पेस्ट बनवा. नंतर ही पेस्ट पाण्यात मिसळून स्प्रे बाटलीत भरा. या मिश्रणाची दिवसातून दोनदा घरामध्ये फवारणी करा.