
राज्यातील जिल्हा अधीक्षक व आयुक्तालयातील मिळून 22 आयपीएस अधिकाऱयांच्या आज बदलीचे आदेश गृह विभागाने जारी केले. राजतिलक रोशन, समीर शेख, राकेश ओला यांची मुंबई आयुक्तालयात बदलीने नवी नियुक्ती करण्यात आली आहे.
अधिकारी व त्यांच्या नव्या नियुक्तीचे ठिकाण
राकेश ओला- मुंबई, सोमनाथ घार्गे- अहिल्यानगर (अधीक्षक), आंचल दलाल- रायगड (अधीक्षक), महेंद्र पंडित- ठाणे शहर, योगेश पुमार गुप्ता- कोल्हापूर (अधीक्षक), बच्चनसिंग- राज्य राखीव पोलीस बल (नागपूर), अर्चित चांडक- अकोला (अधीक्षक), मंगेश शिंदे- लोहमार्ग (नागपूर), राजतिलक रोशन – मुंबई, बाळासाहेब पाटील- नाशिक ग्रामीण (अधीक्षक), यतिन देशमुख- पालघर (अधीक्षक), सौरभ अगरवाल – गुन्हे अन्वेषण विभाग (पुणे), मोहन दहिकर- सिंधुदुर्ग (अधीक्षक), विश्व पानसरे – राज्य राखीव पोलीस बल (अमरावती), नीलेश तांबे- बुलढाणा (अधीक्षक), समीर शेख- मुंबई, तुषार दोशी – सातारा (अधीक्षक), सोमय मुंडे- छत्रपती संभाजीनगर, जयंत मीना- लातूर (अधीक्षक), नितीन बगाटे – रत्नागिरी (अधीक्षक), रितू खोकर- धाराशीव (अधीक्षक), संजय जाधव यांचीही बदली करण्यात आली असून त्यांच्या नियुक्तीचे स्वतंत्र आदेश काढण्यात येणार आहेत.