
मुंबई विद्यापीठाच्या पदवी-पदव्युत्तर अभ्यासक्रमांच्या प्रवेशपूर्व ऑनलाइन नाव नोंदणीला 26 मेपर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. आतापर्यंत सव्वा दोन लाख विद्यार्थ्यांनी नोंदणी केली आहे. तसेच नॅक वा एनबीए मूल्यांकन नसल्याने वगळण्यात आलेल्या महाविद्यालयांनाही आता प्रवेश प्रक्रियेत सामावून घेण्यात आले आहे. विद्यापीठाच्या विविध अभ्यासक्रमांकरिता 27 तारखेला पहिली गुणवत्ता यादी जाहीर केली जाईल.
विद्यापीठाशी संलग्नित, स्वायत्त महाविद्यालये, मान्यताप्राप्त शिक्षण संस्था आणि विद्यापीठातील शैक्षणिक विभागामध्ये शैक्षणिक वर्ष 2025-2026 साठी पदवीच्या 3 आणि 4 वर्षीय अभ्यासक्रमांच्या प्रथम वर्षाच्या प्रवेशासाठी ही ऑनलाइन नाव नोंदणीला बंधनकारक आहे. विद्यापीठाच्या https://mu.ac.in/admission या संकेतस्थळावर जाऊन विद्यार्थ्यांना प्रवेशपूर्व ऑनलाइन नाव नोंदणी करायची आहे.
अडीच लाख विद्यार्थ्यांची नोंदणी
आतापर्यंत 2,25,556 एवढी नोंदणी झाली असून, 1,45,087 एवढय़ा विद्यार्थ्यांनी विविध अभ्यासक्रमांसाठी 5,09,578 एवढे अर्ज सादर केले आहेत.
प्रवेशाचे सुधारित वेळापत्रक
26 मेपर्यंत (दुपारी 1पर्यंत) – अर्ज विक्री (संबधित महाविद्यालयाद्वारे ऑनलाइन/ऑफलाइन), प्रवेशपूर्व ऑनलाइन नोंदणी, ऑनलाइन फॉर्म सादर करणे, इन हाऊस आणि अल्पसंख्याक कोटा प्रवेश
n 27 मे (संध्याकाळी 5) – पहिली मेरिट लिस्ट
n 28 ते 30 मे – (दुपारी 3) – ऑनलाइन कागदपत्रे पडताळणी आणि शुल्क भरणे (हमीपत्र फॉर्मसह)
n 31 मे (संध्याकाळी 7) – दुसरी मेरिट लिस्ट
n 2 ते 4 जून (दुपारी 3) – ऑनलाइन कागदपत्रे पडताळणी आणि शुल्क भरणे
n 5 जून (संध्याकाळी 7) – तिसरी मेरिट लिस्ट
n 6 ते 10 जून (दुपारी 3) – ऑनलाइन कागदपत्रे पडताळणी आणि शुल्क भरणे