राईचा पर्वत केला! सरन्यायाधीशांनी वकिलाला ठोठावला सात हजारांचा दंड

सरन्यायाधीश भूषण गवई महाराष्ट्रात आले तेव्हा वरिष्ठ अधिकाऱ्यांनी राजशिष्टाचाराचे पालन केले नव्हते. संबंधित राजशिष्टाचार उल्लंघनप्रकरणी चौकशीची मागणी करणाऱ्या वकिलाला सरन्यायाधीशांनीच झटका दिला. तुम्ही राईचा पर्वत केला आहे. तुमचा प्रसिद्धी मिळवण्याचा खटाटोप दिसतोय, वर्तमानपत्रात नाव छापून यावे हाच तुमचा उद्देश दिसतोय. या क्षुल्लक गोष्टीला जास्त महत्त्व देऊ नका, असे मी यापूर्वीच सांगितले आहे, असे सरन्यायाधीशांनी याचिकाकर्त्या वकिलाला झापले आणि सात हजार रुपयांचा दंड ठोठावला.