India Squad For England Tour – इंग्लंड दौऱ्यात गिल कर्णधार, तर उपकर्णधारपदीही नवा खेळाडू; हिंदुस्थानचा संपूर्ण संघ जाणून घ्या…

भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (BCCI) इंग्लंडविरुद्धच्या कसोटी मालिकेसाठी टीम इंडियाची घोषणा केली आहे. या दौऱ्यात हिंदुस्थान आणि इंग्लंड यांच्यात 5 कसोटी सामन्यांची मालिका खेळली जाणार आहे. यासाठी युवा फलंदाज शुभमन गिलकडे कर्णधारपदाची धुरा सोपवण्यात आली असून उपकर्णधारपदाची माळ ऋषभ पंतच्या गळ्यात पडली आहे.

काही दिवसांपूर्वीच रोहित शर्मा आणि विराट कोहली या दोन्ही स्टार खेळाडूंनी कसोटी क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा केली होती. त्यामुळे या कसोटी मालिकेत कोणाला संधी मिळते याकडे क्रिकेटप्रेमींचे लक्ष लागले होते. यानंतर आता बीसीसीआयने ट्वीट करत इंग्लंड दौऱ्यासाठी टीम इंडियाच्या 18 सदस्यीय संघाची घोषणा केली आहे.

इंग्लंड दौऱ्यासाठी बीसीसीआयने 18 खेळाडूंची घोषणा केली आहे.

शुभमन गिल (कर्णधार), ऋषभ पंत (उपकर्णधार), यशस्वी जयस्वाल, करुण नायर, रवींद्र जाडेजा, वॉशिंग्टन सुंदर, शार्दुल ठाकूर, जसप्रीत बुमराह, मोहम्मद सिराज, आकाश दीप, कुलदीप यादव, के एल राहुल, साई सुदर्शन, अभिमन्यू ईश्वरन, ध्रुव जुरेल, प्रसिद्ध कृष्णा, अर्शदीप सिंग, नितीश कुमार रेड्डी

टीम इंडियाचा इंग्लंड दौरा 20 जूनपासून सुरू होणार आहे. या दौऱ्यामध्ये टीम इंडिया आणि इंग्लंड याच्यात पाच सामन्यांच्या कसोटी मालिका खेळली जाणार असून त्यासाठी आता टीम इंडिया सज्ज झाली आहे. मात्र, टीम इंडियाचा स्टार फलंदाज श्रेयस अय्यरला या मालिकेतून वगळण्यात आल्याने क्रीडा प्रेमींनी नाराजी व्यक्त केली आहे. तसेत मोहम्मद शमी आणि सरफराज खान यांना सुद्धा संघात स्थान देण्यात आलेले नाही.