मध्य आणि हार्बर मार्गांवर आज मेगा ब्लॉक

मध्य आणि हार्बर रेल्वे मार्गांवर रविवारी ब्लॉक घेण्यात येणार आहे. मध्य रेल्वेवर माटुंगा ते मुलुंड अप आणि डाऊन धीम्या मार्गावर सकाळी 11.05 ते दुपारी 3.55 वाजेपर्यंत ब्लॉक असेल. ठाणे आणि वाशी/नेरुळ स्थानकांदरम्यान अप व डाऊन ट्रान्स-हार्बर मार्गावर सकाळी 11.10 ते दुपारी 4.10 वाजेपर्यंत ब्लॉक घेण्यात आला आहे. या काळात वाशी/नेरुळ आणि ठाणे स्थानकांदरम्यान अप आणि डाऊन ट्रान्स-हार्बर मार्गावरील सेवा बंद राहतील. ठाणे येथून सकाळी 10.35 ते दुपारी 4.07 वाजेपर्यंत वाशी/नेरुळ/पनवेलसाठी सुटणाऱ्या डाऊन लाईन लोकल फेऱ्या आणि पनवेल/नेरुळ/वाशी येथून सकाळी 10.25 ते दुपारी 4.09 वाजेपर्यंत ठाणेसाठी सुटणाऱ्या अप लाईन लोकल फेऱ्या रद्द केल्या आहेत.