एक्सची सेवा कोलमडली

सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सची सेवा आज शनिवारीही कोलमडलेली होती. डेटा सेंटरमधील तांत्रिक बिघाडामुळे आउटेजचा सामना करावा लागत असून शनिवारी संध्याकाळी 5.46 वाजल्यापासून सेवा बंद झाली होती. त्यामुळे हिंदुस्थानसह जगभरातील वापरकर्त्यांना लॉग इन करणे, साइन अप करणे, पोस्ट करणे आणि पाहणे तसेच प्रीमियम सेवांसह प्रमुख वैशिष्टय़े वापरण्यात अडचणी येत होत्या. सेवा कोलमडल्याने 25 हजारांहून अधिक तक्रारी आल्या.