साताऱ्याचा बाहुबली

पैलवानांचा जिल्हा म्हणून ओळख असलेल्या सातारा जिह्यात मुसळधार पाऊस बरसत आहे. यामुळे नदी-नाले दुथडी भरून वाहत आहेत. काही रस्ते डांबराचे नसल्याने या ठिकाणी मोठ्या प्रमाणात चिखल साचला आहे. रस्त्यावर चिखल साचल्याने बाईक जात नव्हती. या पठ्ठय़ाने थेट बाईकलाच खांद्यावर घेतले अन् रस्ता पार केला. हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.