आपण पस्तीशीनंतर जेव्हा चाळीशीकडे वाटचाल करायला लागतो, तेव्हा आपल्या शरीरामध्ये विविध बदल घडू लागतात. या आंतरीक बदलामुळे आपल्याला आरोग्याकडे अधिक लक्ष देण्याची गरज आहे. जेणेकरून आपण येणाऱ्या अनेक वर्षांसाठी निरोगी आणि सक्रिय राहू शकू. योग्य जीवनशैली आणि नियमित आरोग्य तपासणी आपल्याला गंभीर आजारांपासून वाचवतेच, शिवाय आपल्या जीवनाची गुणवत्ता देखील सुधारते.

जेवणानंतर लगेच या 5 गोष्टी कधीही करू नका, आरोग्यावर होतील वाईट परीणाम

प्रत्येक वयाचे स्वतःचे असे वैशिष्टय असते. पस्तीशीनंतर चाळीशी ही खूप महत्त्वाची मानली जाते. या वयानंतर शारीरिक बदल वेगाने घडू लागतात. हाडांची ताकद कमी होऊ लागल्याने, प्रजनन क्षमता देखील हळूहळू कमी होऊ लागते. म्हणूनच आरोग्याची काळजी घेणे आणि नियमित तपासणी करणे खूप महत्वाचे आहे.

35-40 वर्षांच्या वयात शरीरात अनेक महत्त्वाचे बदल होतात, जसे की हाडांची ताकद कमी होणे, चयापचय मंदावणे आणि प्रजननक्षमतेत बदल. या बदलांकडे दुर्लक्ष केल्यास गंभीर आरोग्य समस्या उद्भवू शकतात. परंतु वेळेवर आरोग्य तपासणी करून, नियमित तपासणी करून आणि निरोगी जीवनशैली स्वीकारून आपण या बदलांना तोंड देऊ शकतो. तज्ज्ञांच्या मते, नियमित व्यायाम आणि संतुलित आहारामुळे केवळ शरीर तंदुरुस्त राहत नाही तर मानसिक आरोग्य देखील राखले जाते. मानसिक संतुलन राखण्यासाठी, ताणतणाव नियंत्रित करणे आणि योग आणि ध्यान करणे खूप फायदेशीर आहे.

रक्तातील साखरेची तपासणी: मधुमेहाचा धोका वाढतो, म्हणून नियमित रक्तातील साखरेची तपासणी करावी.

 

रक्तदाब तपासणी: उच्च रक्तदाब अनेकदा लक्षणांशिवाय होतो, परंतु त्यामुळे हृदय आणि मूत्रपिंडाचे आजार होऊ शकतात.

कोलेस्टेरॉल तपासणी: उच्च कोलेस्टेरॉल पातळीमुळे हृदयरोगाचा धोका वाढतो.

हाडांची ताकद: हाडांची घनता कमी होऊ लागते आणि हाडांच्या फ्रॅक्चरचा धोका वाढतो, म्हणून कॅल्शियम आणि व्हिटॅमिन डीची पातळी तपासणे महत्वाचे आहे.

 

तुमच्या मानसिक आरोग्याची काळजी घ्या
35-40 वयोगटातील लोकांमध्ये ताणतणाव आणि चिंता सामान्य आहे. पण त्याला सामोरे जाणे खूप महत्वाचे आहे. मानसिक आरोग्याला प्राधान्य देण्यासाठी ध्यान, योग आणि पुरेशी झोप आवश्यक आहे.

 

 

नियमित व्यायाम करा
35-40 वर्षांच्या वयात सक्रिय राहणे खूप महत्वाचे आहे. दररोज किमान ३० मिनिटे मध्यम व्यायाम, जसे की चालणे, योगा किंवा एरोबिक्स, शरीराला तंदुरुस्त आणि ऊर्जावान ठेवण्यास मदत करते.

 

 

योग्य आहाराचे पालन करा
खाण्याच्या सवयींचा शरीरावर थेट परिणाम होतो. फास्ट फूड टाळा आणि ताजी फळे, भाज्या, डाळी आणि कमी चरबीयुक्त प्रथिने खाण्याचे प्रमाण वाढवा.