मानसिक आरोग्यासाठी व्यायाम करण्याचे अगणित फायदे, वाचा

बदाम खाल्ल्याने मेंदू तल्लख होतो हे आपल्या सर्वांना माहित आहे. परंतु, वेगवेगळ्या संशोधनात हे सिद्ध झाले आहे की, व्यायामामुळे मेंदूची कार्यक्षमता अधिक सुधारते. तसेच वृद्धापकाळात होणाऱ्या आजारांनाही प्रतिबंधित करते. दररोज व्यायाम केल्याने शारीरिक आणि मानसिक आरोग्यासाठी खूप फायदे होतात. दररोज व्यायाम करण्याचा एक उत्तम फायदा म्हणजे तो आपल्या मेंदूसाठी खूप फायदेशीर आहे. व्यायामामुळे मेंदूमध्ये न्यूरोट्रॉफिक घटक नावाच्या काही रसायनांचे उत्पादन वाढते. मेंदूच्या पेशींच्या वाढीस फायदेशीर ठरतात आणि त्यांच्या अस्तित्वात देखील मदत करतात.

 

मानसिक आरोग्यासाठी व्यायामाचे फायदे

जसजसे आपण मोठे होतो तसतसे आपली स्मरणशक्ती कमी होते, म्हणून या बाबतीतही व्यायाम करणे फायदेशीर ठरू शकते. अभ्यासातून असे दिसून आले आहे की, दररोज शारीरिक हालचाली करतात त्यांना अल्झायमर आणि डिमेंशिया सारख्या वृद्धत्वाशी संबंधित आजारांचा धोका लक्षणीयरीत्या कमी होतो.

व्यायामामुळे मेंदूच्या नुकसानीचा धोका लक्षणीयरीत्या कमी होतो आणि मेंदूच्या एकूण कार्यात सुधारणा होऊ शकते. यामुळे आपला मूड सुधारतो, त्यामुळे ताण आणि चिंता लक्षणीयरीत्या कमी होते. यामुळेच आपण मानसिक आणि भावनिकदृष्ट्या पूर्वीपेक्षा परिस्थितीशी लढण्यासाठी तयार होता.

 

दररोज व्यायाम करण्याचा आणखी एक फायदा म्हणजे झोप चांगली लागते. व्यायामामुळे झोपेमध्ये खूप सुधारणा होते. तसेच मेंदूचे आरोग्य सुधारण्यासाठी सुद्धा व्यायाम महत्त्वाचा मानला जातो.

दररोज किती वेळ व्यायाम करावा?
निरोगी मेंदूसाठी सरासरी व्यक्तीने आठवड्यातून 150 मिनिटे मध्यम-तीव्रतेचा व्यायाम किंवा 75 मिनिटे एरोबिक व्यायाम करावा.