Jalna News – घनसावंगी तालुक्यात मुसळधार पाऊस, बोडखा येथील नारोळा नदीला पूर

जालना जिल्ह्यातील घनसांगवी तालुक्यात मंगळवारी (27 मे 2025) पावसाच्या जोरदार सरी कोसळल्या. मुसळधार पावसामुळे शेतकऱ्यांना चांगलाच फटका बसला आहे. फळबाग, भाजीपाला, बाजरी, मका, भुईमूग या पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. दुपारी 1 वाजता सुरू झालेला पाऊस अडीच तास मनसोक्त कोसळला. त्यामुळे शेतांमध्ये गुडघ्या इतकं पाणी जमा झालं आणि पिकांच मोठं नुकसान झालं आहे. मुसळधार पाऊस झाल्याने नदी, नाले दुथडी भरून वाहत आहेत.

घनसावंगी तालुक्यात खरीप हंगामात 99 हजार हेक्टरवर पेरणीचे नियोजन करण्यात आल्याचे कृषी विभागाने सांगितले आहे. मात्र तालुक्यात मागील आठ ते दहा दिवसांपासून अधून मधून पाऊस हजेरी लावत असल्यामुळे शेतकर्‍यांना शेतीची मशागत करणे अवघड झाले आहे. घनसावंगीसह सर्वच महसूल मंडळात अतिवृष्टी सदृश्य मुसळधार पाऊस झाला आहे. या पावसाने बोडखा येथील नारोळा नदीला महापूर आला आहे. तसेच पुलावरून पाणी वाहत असल्याने बोडखा ते घनसावंगी वाहतूक खोळंबली होती. या मुसळधार पावसाने तालुक्यात फळबाग, भाजीपाल, बाजरी, मका, भुईमूग या पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. ओढे, नाले तुडूंब भरुन वाहत असून नद्यांना पुर आले आहेत. तर अनेक ठिकाणी शेतात गुडघ्या इतके पाणी साचल्याने शेतकर्‍यांच्या फटका बसला आहे.