महिला महाराष्ट्र प्रीमियर लीग, पुणे वॉरियर्स संघाला विजेतेपद  

कर्णधार अनुजा पाटील नाबाद 30 धावा व 2-30 हिने केलेल्या अष्टपैलू खेळीच्या जोरावर पुणे वॉरियर्स संघाने अंतिम लढतीत सोलापूर स्मॅशर्स संघावर 1 धावेने थरारक विजय मिळवत महिला महाराष्ट्र प्रीमियर लीग (डब्लूएमपीएल) टी-20 क्रिकेट स्पर्धेत विजेतेपद पटकाविले. गहुंजे येथील महाराष्ट्र क्रिकेट संघटनेच्या मैदानावर ही स्पर्धा पार पडली. पावसाच्या व्यत्ययामुळे अंतिम सामना प्रत्येकी 18 षटकांचा खेळविण्यात आला.

संक्षिप्त धावफलक 

पुणे वॉरियर्स ः 18 षटकांत 6 बाद 129 धावा (अनुजा पाटील नाबाद 30, अक्षया जाधव 29, श्वेता माने 25, खुशी मुल्ला 17, सुहानी कहांडळ 20, स्वांजली मुळे 2-6, आचल अगरवाल 2-26, शरयू कुलकर्णी 1-19) वि.वि. सोलापूर स्मॅशर्स ः 18 षटकांत 6 बाद 128 धावा (मुक्ता मगरे 40, शाल्मली क्षत्रिय 34,  ईश्वरी सावकार 22, तेजल हसबनीस 16, इशिता खळे 2-24, अनुजा पाटील 2-30) सामनावीर ः अनुजा पाटील.

इतर पारितोषिके 

सर्वोत्कृष्ट फलंदाज ः ईश्वरी सावकार
(247 धावा, सोलापूर स्मॅशर्स).

सर्वोत्कृष्ट गोलंदाज ः चिन्मयी बोरफळे
(13 विकेट, पुणे वॉरियर्स).