
भारतीय स्टेट बँक (एसबीआय) ने क्रेडिट कार्डधारकांना जोरदार झटका दिला आहे. एसबीआय येत्या 15 जुलैपासून क्रेडिट कार्डच्या नियमात बदल करणार आहे. नव्या नियमानुसार, आता ग्राहकांना विमान दुर्घटना विमा कव्हर मिळणार नाही. एसबीआय कार्ड एलिट, माइल्स एलिट आणि माइल्स प्राइम यासारख्या प्रीमियम कार्डस्वर मिळणारी 1 कोटी रुपयांची कॉम्प्लिमेंट्री एअर एक्सिडेंट विमा कव्हर 15 जुलै 2025 पासून बंद करण्यात येणार आहे. तसेच एसबीआय कार्ड प्राइम आणि पल्स कार्डधारकांना मिळत असलेला 50 लाख रुपयांचा विमासुद्धा यापुढे मिळणार नाही. तसेच 11 ऑगस्ट 2025 पासून युको बँक एसबीआय कार्ड एलिट, सेंट्रल बँक एसबीआय कार्ड एलिट, कर्नाटक बँक एसबीआय प्लॅटिनम कार्ड आणि फेडरल बँक एसबीआय प्लॅटिनम कार्डसारख्या सह ब्रँडेड कार्डस्वर मिळणारा विमा कव्हरसुद्धा हटवला जाणार आहे.