
देशातील पहिली पाणबुडीविरोधी युद्धनौका शॅलो वॉटर क्राफ्ट आयएनएस युद्धनौका बुधवारी सीडीएस जनरल अनिल चौहान यांच्या प्रमुख उपस्थितीत नौदलात दाखल झाली. या युद्धनौकेला विशाखापट्टणम येथील नेव्ही डॉकयार्डमध्ये कार्यान्वित केले जाणार आहे. अर्नाळा किल्ल्यावरून या युद्धनौकेला हे नाव देण्यात आले आहे. ही युद्धनौका पाण्यात शत्रूच्या पाणबुडय़ा शोधून त्याचा मागोवा घेऊन त्यांना नष्ट करण्याचे काम करणार आहे.